उद्या बोरी येथे बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळा

ना. गिरीष महाजन, पालकमंत्री डॉ. भोयर यांची उपस्थिती

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : जिल्ह्यातील प्रगतशील शेतकर्‍यांचा गौरव करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, मुल्यवर्धन आणि विविध शासकीय योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २२ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता सेलू तालुयातील बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
jhjk
 
 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहतील. यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मृद व जलसंधारण राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, खासदार अनिल बोंडे, खासदार अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. डॉ. नवनीता काकडे, आ. संजय भेंडे, आ. अरुण लखानी, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित राहणार आहे.
 
 
यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य तसेच विविध अनुदान योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
 
 
सेलू तालुयातील बोरी कोकाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुपारी ३.३० वाजता आयोजित या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी उद्योग, युवक व महिला शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर यांनी केले आहे.