चंद्रपूर,
chandrpur-continuous-rainfall : चंद्रपूर महानगरासह जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवार, 21 जुलै रोजी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप असून, या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा दिला. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पिकांसाठी नवसंजीवनी म्हणूनही या पावसाकडे बघितले जात आहे. धानपट्टयातील रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना आता वेग येणार आहे.
सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मंगळवार, 21 जुलै रोजी सकाळपासूनच महानगरासहजिल्ह्यातील राजुरा, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोडा, नागभीड, भद्रावती अशा तालुक्यात सकाळपासून संततधार सुरू आहे. तर सावली, मूल तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होणार असून, शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वेळेवर झालेल्या पावसामुळे हे संकट टळल्याने शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मूल तालुक्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विशेषतः धान, कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांच्या लागवडीला वेग आला असून, शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. या पावसामुळे केवळ शेतीच नव्हे, तर विहिरी, तलाव आणि जलस्रोतांमधील साठा वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात 121.2 मिमी पाऊस
जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत सरासरी 121.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 307.2 मिमी पाऊस बल्लारपूर तालुक्यात, तर सर्वात कमी 38.7 मिमी पाऊस राजुरा तालुक्यात झाला आहे. तर, ब्रम्हपुरी तालुक्यात 145.1 मिमी, कोरपना 142.4 मिमी, सिंदेवाही 118.1 मिमी, नागभीड 145.7 मिमी, चंद्रपूर 186.0 मिमी, मूल 87.6, चिमूर 104.4 मिमी, वरोडा 105.0 मिमी, जिवती 118.2 मिमी, भद्रावती 123.7 मिमी, गोंडपिपरी 136.9 मिमी, पोंभुर्णा 95.4, तर सावली तालुक्यात 103.0 पावसाची नोंद झा