पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरराहुल-प्रियांकासह काँग्रेसचे आंदोलन

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
congress-protest ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, या मुद्यावर काँग्रेसने थेट पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशाची शिक्षण व्यवस्था ढासळत असताना सरकार डोळे मिटून बसल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षांकडून करण्यात आला.

rahul priyanka 
 
लाठीमाराचा तीव्र निषेध
congress-protest लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलक विद्यार्थ्यांवर काल झालेल्या पोलिस लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. तत्पूर्वी, त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर संसदेत तत्काळ विशेष चर्चेची मागणी केली.
गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा - राहुल गांधी
congress-protest या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, असे सांगतानाच राहुल गांधी यांनी गृहमंत्रालयालाही धारेवर धरले. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार हा गृहमंत्रालयाच्या संमतीशिवाय शक्य नाही, असा दावा करत त्यांनी शिक्षणमंत्र्यांसोबतच गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली.