विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत ९२.६० टक्के गणना प्रपत्रांचे वितरण: जिल्हाधिकारीविशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचा आढावा

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वाशीम,
voter verification विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम समाधानकारक गतीने सुरू असून, गणना प्रपत्रांचे वितरण आणि त्यांचे संगणकीकरण (डिजिटायझेशन) वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी अधिक समन्वयाने काम करावे. उर्वरित प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून काम विहित मुदतीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
 
 

voter verification 
 
 
या आढावा बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे ,नगरपालिका सहाय्यक आयुक्त परदेशी उपस्थित होते. तसेच सर्व मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकारी दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी म्हणाले की, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, प्रत्येक मतदारापर्यंत गणना प्रपत्र (इन्युमरेशन फॉर्म) पोहोचवून त्याची माहिती तातडीने संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यावरही भर देण्यात यावा.
जिल्ह्यातील १० लाख १९ हजार ५१९ मतदारांपैकी ९ लाख ४४ हजार ५३ मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण पूर्ण झाले असून, ही प्रगती ९२.६० टक्के आहे.voter verification तसेच ६ लाख २१ हजार ४७३ प्रपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून ते ६०.९६ टक्के आहे. मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा दैनंदिन प्रगतीचा आढावा घेत उर्वरित प्रपत्रांचे वितरण व संगणकीकरण तातडीने पूर्ण करावे, असे निर्देशही दिले. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.