पर्यावरणाचे संरक्षण वारकरी म्हणून करा : जिल्हाधिकारी

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
vanmathi-c : पर्यावरण विषयी जागृत होऊन एक तरी दीर्घकाळ टिकणारे तसेच भरपूर ऑसिजन देणारे वृक्षरोप लावून पर्यावरण संतुलन राखणे आज गरजेचे आहे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर संस्कार केले तर भविष्यामध्ये नक्कीच आपण पुढच्या पिढीला योग्य प्रमाणात ऑसिजन, सोबतच सुख समाधानी जीवण जगण्याकरिता लागणारे पर्यावरणीय वातावरण आबादीत ठेऊ शकू. ती आज काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण वारकरी म्हणुन करा असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.
 

jik 
 
 
 
निसर्ग सेवा समिती, वर्धा स्काऊट गाईडचे जिल्हा कार्यालय यांच्या संयुत वतीने पर्यावरणाची वारी, वृक्षदिंडी सोहळ्याच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरसेवक सतीश मिसाळ उज्वला पेठे, जनहित मंचचे अध्यक्ष डॉ. राजेश आसमवार, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक वन विभाग सुहास बढेकर, तालुका कृषी अधिकारी संदीप ढोणे, अजय वानखेडे, बाळकृष्ण हांडे, नितेश झाडे, वैशाली घोम, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे उपस्थित होते.
 
 
विद्यार्थी तसेच पाहुण्यांच्या हस्ते ऑसिजन पार्क परिसरात विविध प्रजातीची १०० वृक्षारोपांचे लागवड करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, बँक ऑफ इंडियाचे अंचलीक प्रबंधक निर्मेश, जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, पूर्व ग्रामीण बँकेचे अध्यक्ष विनायक बुचे, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री घारपडकर (राऊत), शिक्षणाधिकारी प्राथमिक रुपेश कांबळे आदींची उपस्थिती होती. वर्धेच्या विविध ३० शाळांमधून प्रामुख्याने ४०० पेक्षा जास्त स्काऊट गाईड, कप बुलबुल मुल मुली, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. प्रास्ताविक मुरलीधर बेलखोडे यांनी केले संचालन दामोदर राऊत यांनी केले