गडचिरोली,
gadchiroli tribal doctors association गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनची अधिकृत स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित डॉक्टर्स डे व सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक कार्यक्रमात जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत कार्यरत 200 हून अधिक आदिवासी डॉक्टर उपस्थित होते.
या नव्या संघटनेचा मुख्य उद्देश आदिवासी डॉक्टरांमध्ये परस्पर समन्वय, व्यावसायिक सहकार्य, सामाजिक ऐक्य आणि जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे हा आहे. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन ‘हेल्थ मास्टर प्लॅन’ तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी आणि डॉ. समता मडावी यांचा सेवापूर्ती निमित्त विशेष सपत्नीक सत्कार करण्यात आल
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आरोग्य विभाग, मुंबईचे उपसंचालक, डॉ. पुरुषोत्तम मडावी, उपसंचालक डॉ. दीपचंद सोयाम, चंद्रपूरचे उपअधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे विभागप्रमुख डॉ. दिलीप कुमरे, डॉ. छाया उईके, सीआरपीएफचे कमांडंट डॉ. वसंत कुमरे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रविण किलनाके व डॉ. रजनी तोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ही संघटना गडचिरोली जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेल्या तसेच राज्य, देश व परदेशात कार्यरत सर्व आदिवासी डॉक्टरांसाठी एक समान, नोंदणीकृत आणि हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. प्रियदर्शनी कोडापे, डॉ. प्रतिभा वड्डी आणि डॉ. एकता कुमरे यांनी तर डॉ. चेतन कोवे व डॉ. केतन कुंभरे यांनी आभार मानले.gadchiroli tribal doctors association कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सचिन मडावी, डॉ. सुनील मडावी, डॉ. चेतन कोवे, डॉ. नितीन मसराम, डॉ. सोनल कोवे, डॉ. मनोहर मडावी, डॉ. तारकेश्वर उईके, डॉ. संदीप किरंगे, डॉ. आशीष शेडमाके, डॉ. उमेश सिडाम, डॉ. प्रज्ञा मसराम आणि डॉ. पुरुषोत्तम कुमरे यांनी सहकार्य केले.