आर्वी,
matru-seva-sangh-hall-in-arvi : मातृसेवा संघ शाखा आर्वीची वार्षिक आमसभा व आमदार निधीतून बांधकाम केलेल्या सभागृहाचे लोकार्पण आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, मातृसेवा संघाच्या अध्यक्ष अॅड. अरुणा देशपांडे, सचिव ज्योती भट, कविता जोशी आदी उपस्थित होते.
आमदार सुमित वानखडे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार दादाराव केचे यांनीही मातृसेवा संघाला वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू यांनी नपच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक अॅड अरुणा देशपांडे यांनी केले. संचालन शिवानी देशपांडे यांनी तर आभार शैला देशपांडे मानले. मातृसेवा संघाच्या आमसभेत सचिव ज्योती भट, कोषाध्यक्ष माया देशपांडे यांनी विषयाचे वाचन केले तर आमसभेने त्याला मंजुरी दिली.
प्रास्ताविक अॅड. अरुणा देशपांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सदस्य योगिता पांडे, स्नेहल देशमुख, देवयानी देशपांडे, डॉ. पल्लवी खंडेलवाल, गणपत कालभूत, सुधाकर कुरवाडे, साधना कुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.