वर्धेत सहकार संकुलासाठी १ हेक्टर जमीन

* महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
land-for-cooperative-complex : शहरानजीजकच्या पिंपरी (मेघे) येथील १ हेक्टर शासकीय जमीन सहकार संकुल इमारतीच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने याबाबत शासन ज्ञापन जारी केले असून, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांच्या नावे ही जमीन विविध अटी व शर्तींसह उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
 

jlk 
 
 
 
या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यात सहकार विभागाच्या प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम होणार असून एकाच ठिकाणी विविध सहकारी संस्थांशी संबंधित कामकाजासाठी आधुनिक सहकार संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि सहकारी संस्थांना अधिक कार्यक्षम सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन सहकार क्षेत्राच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असून, या प्रकल्पामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास ना. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
 
सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना सहकार विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वर्धेत आधुनिक सहकार संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.