विद्यार्थिनीला अश्लील मजकूर पाठविणे भोवले

*हिंदी विद्यापीठातील तांत्रिक सहाय्यकावर गुन्हा

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठातील तांत्रिक सहाय्यक हरिषचंद्र शाह याच्यावर विद्यापीठातीलच एका विद्यार्थीला अश्लील मजकूर पाठविल्या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
k
 
 
हरिषचंद्र शहा हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करतात. त्याने हिंदी विद्यापीठातीलच एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील मजकूर पाठविला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वी संबंधित प्रकरणी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या मेलवर मुलीने तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली. चौकशीतही सदर प्रकरण गंभीर असल्याचे पुढे आल्यावर २० रोजी विद्यापीठाच्या वतीने राजेशकुमार यादव यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी हरिषचंद्र शाह विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.