वाशीम,
ukalipen tourism development project तालुक्यातील उकळीपेन गावासाठी पर्यटन विकास योजने अंतर्गत विकासकामासाठी ५० लाखाचा निधी मिळाला. मात्र, या निधीत प्रचंड अपहार झाला असून, या कामाची चौकशी करण्याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते नागेश भोयनवाड यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, जिल्हाधिकारी वाशीम यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत ना. बावनकुळे यांनी स्थानिक प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले असले तरी प्रशासनाकडुन कोणतीही चौकशी अद्याप करण्यात आली नाही.

याबाबत तक्रारीत नमूद केले आहे की, तालुक्यातील उकळीपेन येथे वन विभागाच्या जमीनीवर महादेवाचे मंदीर आहे. त्याठिकाणी पर्यटन विकास योजना अंतर्गत विकासकामे करण्याकरीता लाखो रुपयाचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला. मात्र, सदर जमीन वनविभागाची असल्याने त्याठिकाणी कामे करण्यास वनप्रशासनाने परवानगी दिली नाही. सदर जागा ग्रापं प्रशासनाची नसतांना ग्रापं ने खोटे ठराव घेऊन तसेच नाहरकत प्रमाणपत्र देवून पर्यटन विकासासाठी आलेला निधीतून डोमशेड, रस्ते, लाईट ईत्यादी नियमबाह्य कामे करुन त्यामध्ये लाखो रुपयाचा अपहार केला. ३० जानेवारी २०२४ ला ग्रापं ने ठराव घेतला आणि विकासकामासाठी १५ ऑटोबर २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये महादेव मंदीराजवळ, जिल्हा परिषद पटांगणामध्ये डोमशेड बांधकाम करण्याऐवजी गट क्र. २५१ मध्ये खाजगी जागेवर डोमशेड चे थातूरमातुर काम केले. ज्या लोकांच्या खाजगी जागेत डोमशेड उभारण्यात आले त्या जागा मालकांनी जिल्हाधिकारी, जिप मुख्य कार्यपालन अधिकारी, यांच्याकडे तक्रार दिली असली तरी त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. वास्तविक पाहता हे डोमशेड शासकीय जागेवर उभारायला पाहीजे होते. मात्र, ग्रापं ने खोटा ठरावाद्वारे हे डोमशेड खाजगी जागेत उभारुन त्यामध्ये लग्न सोहळे व इतर सोहळ्े करुन त्यांच्याकडून एका कार्यक्रमाचे हजारो रुपये घेतल्या जात असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत तक्रारकर्ते नागेश भोयनवाड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तक्रार दिली. त्यावरुन ना. बावनकुळे यांनी स्थानिक प्रशासनाला डोमशेड कामाची चौकशी करण्याचे आदेशीत केले. मात्र, स्थानिक प्रशासनाने महसूल मंत्र्याच्या चौकशी आदेशालाही न जुमानता भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.ukalipen tourism development project ज्या ठिकाणी डोमशेड उभारले तरी जागा गट क्र. २५१ लेआऊट मधील खुली जागा आहे. या जागेवर केवळ त्या लेआऊटमध्ये राहणार्या लोकांचा अधिकार असतांना केवळ स्वतःच्या फायद्यासाठी त्याठिकाणी थातुरमातूर डोमशेड उभारुन निधीत प्रचंड अपहार केला आहे. तसेच त्या खुल्या जागेला ग्रापं प्रशासनाने तार कंपाऊंड केल्यामुळे तेथील लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केला आहे.