अल्पवयीन मुलीवर महिनाभर लैंगिक अत्याचार

- २१ वर्षीय आरोपी अटकेत

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
minor-girl-sexually-assaulted : घरगुती वादानंतर घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिला आधार देण्याच्या बहाण्याने लग्नाचे आमिष दाखवत महिनाभर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला अटक केली.
 
 
 
ngp
 
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच वस्तीतील रहिवासी आहेत. ११ जूनच्या रात्री आईसोबत किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मुलगी रागाच्या भरात घराबाहेर पडली. ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिचा पाठलाग केला. बोलण्यात गुंतवून तिने आईशी वाद झाल्यामुळे घर सोडल्याचे त्याला सांगितले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिला भाड्याच्या खोलीत ठेवले. लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सुमारे महिनाभर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.