आमदार बकाने यांचा संपर्क अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची तत्परता!

* जर्मनीतून १७ दिवसांनी मृतदेह आला

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
cm fadnaviss राजकारणी वेळप्रसंगी कोणाचेच नसतात असे काहीसे म्हटले जाते. परंतुु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला. देवळी तालुक्यातील छोट्याश्या दहेगाव येथील मुलाचा जर्मनी येथे मृत्यू होतो. तेथुन मृतदेह कसा आणायचा असा प्रश्न उपस्थित झाला. मृतकाच्या मामाने आमदार बकाने यांना माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचण सांगितली. लगेच सर्व सुत्र हलले आणि कायदेशीर कारवाई करीत तब्बल १७ दिवसानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह मायदेशी परतला. जर्मनी ते पुणे मृतदेह आणण्याचा खर्च १५ लाखाच्या आसपास सांगितला होता. तो त्या परिवाराच्या आवाया बाहेर होता. परंतु, आ. बकाने यांच्या शब्दाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आणि तो मृतदेह फत २७ हजारात घरी पोहोचला.
 
 

cm fadnavis 
 
 
देवळी तालुयातील दहेगाव (धांदे) या छोट्या गावातून श्रेयस विश्वास चिकटे हा जर्मनी येथे शिक्षणासाठी याच वर्षी गेला होता. वडिलांचे छत्र आधीच हरपलेले. एकुलता एक मुलगा आईचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करीत होता. पण नियतीला ते मान्य नव्हतं. २८ जून रोजी हजारो किलोमीटर दूर, कुणीही आपलं नसताना पाण्यात बुडून श्रेयसचं निधन झालं. आई तुझे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी लगेच शिक्षण पुर्ण करून परत येईल असे सांगुन गेलेला एकुलता एक श्रेयस आता कायमचा निघून गेला होता. निरोप आल्यानंतर त्याचे पार्थिव मायदेशी कसे आणायचे हा प्रश्न नातेवाईकांपुढे उभा झाला. कुटुंब हतबल होऊन आक्रोश करत होतं. ३ जुलै रोजी श्रेयसच्या मामांनी आमदार राजेश बकाने यांना फोनवर माहिती दिली. आमदार बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. एका आईचं दुःख जाणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंत्रणा तात्काळ जागवली. मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अमोल पाटणकर यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क केला. राजशिष्टाचार सचिव राजेश गव्हांदे यांनी पाठपुरावा करत प्रक्रिया पुढे नेली. तब्बल १७ दिवस विश्वासची आई लेकाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आतुरली होती. सरकारी कायदेशीर प्रक्रीया पुर्ण झाली आणि पुण्यात श्रेयसच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. आईने आपल्या लेकाला शेवटचं पाहिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमोल पाटणकर, राजेश गव्हांदे आणि शेवटपर्यंत चिकटे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमदार राजेश बकाने यांचे श्रेयसच्या कुटुंबियांनी आभार मानले.