ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात

२४ जुलैला प्रारूप तर ४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
gram panchayat elections येत्या २४ जुलैला प्रारूप तर ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने आयोगाने मतदानासाठी आवश्यक असलेल्या इलेट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
 
 
gram panchayat elections
 
 
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अत्याधुनिक आणि अद्ययावत ईव्हीएमचा वापर करण्यात येणार असून, त्यासाठी नवीन कंट्रोल युनिट खरेदी करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रत्येक कंट्रोल युनिटसोबत दोन बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत आणि अडथळामुक्त पार पाडणे शय होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींची संख्या, मतदान केंद्रांची उपलब्धता आणि मतदारसंख्या लक्षात घेऊन ईव्हीएमचे जिल्हानिहाय वाटप निश्चित केले आहे. या नियोजनानुसार मतदान यंत्रे जिल्ह्यांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची फर्स्ट लेव्हल चेकिंग केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल घेण्यात येणार असून, मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी आयोगाकडून विशेष दक्षता घेतली जाणार आहे. यंत्रांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सीसीटीव्ही देखरेख, सुरक्षा व्यवस्था आणि स्वतंत्र स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे.gram panchayat elections अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता आरक्षण, मतदारयादी आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शयता आहे. त्यामुळे राज्यभरातील ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची सर्वात महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व असते. गावच्या विकासकामांपासून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय ग्रामपंचायतीमार्फत घेतले जातात. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ग्रामीण मतदारांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएमची खरेदी, जिल्हानिहाय वितरण, प्रशिक्षण आणि तांत्रिक तयारी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजण्याची शयता असून ग्रामीण राजकारणाला नव्याने वेग मिळणार आहे.