‘बीआयटी’त द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

*प्राचार्य डॉ. नरेंद्र कान्हे यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
principal dr narendra kanhe शिक्षा मंडळाच्या स्थानिक बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी (बीआयटी) येथे २३ आणि २४ जुलै रोजी विज्ञान, शाश्वतता, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील प्रगती (अ‍ॅसेट-२०२६) या विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतासह अमेरिका, चीन, मलेशिया, सौदी अरेबिया आदी राष्ट्रांमधील संशोधक १५० हून अधिक शोधनिबंध सादर करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. नरेंद्र कान्हे यांनी दिली.
 
 

‘बीआयटी’त द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद 
 
 
स्थानिक पिपरी मेघे येथील बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आज मंगळवार २१ रोजी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रतिक कुळकर्णी, डॉ. रोषण मारोडे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. कान्हे पुढे म्हणाले, या द्विदिवसीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि समकालीन वैज्ञानिक, अभियांत्रिकी व शाश्वततेच्या आव्हानांवरील नावीन्यपूर्ण उपायांवर विचारविनिमय करण्यासाठी संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योग व्यावसायिक, धोरणकर्ते आणि पदवी, पदव्युत्तर व पीएचडी संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना एकत्र आणेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला. द्विदिवसीय परिषदेदरम्यान जवळपास १०० उच्च-गुणवत्तेचे शोधनिबंध निवडण्यात आले आहेत. उत्कृष्ट संशोधन सादरीकरण आणि योगदानाच्या सन्मानार्थ प्रत्येक अभियांत्रिकी शाखेत सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्रदान केले जातील. बीआयटीने नेदरलॅण्डसच्या सिनर्जी माइंड्स सोबत सामंजस्य करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेचे उद्घाटन सीएसआयआर-सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी येथील मुख्य वैज्ञानिक प्रा. एस. के. सिंग यांच्या हस्ते होईल.principal dr narendra kanhe यावेळी चिन येथील शांदोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेनॉलॉजी येथील संशोधन वैज्ञानिक डॉ. वालेलिग्न मोल्ला सलीलेव, अमेरिकेतील द युनिव्हर्सिटी ऑफ टेसास पर्मियन बेसिन येथील डॉ. श्रीनिवास राव पेडापती यांची उपस्थिती राहिल. परिषदेत डॉ. व्ही. मुरुगैयन (पीटीयू, पुदुचेरी), डॉ. एन. पूंगुझळी (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली) आदी नामवंत शिक्षण तज्ज्ञांची प्रमुख व्याख्याने आणि तांत्रिक सत्रं होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षा मंडळाचे विश्वस्त संजय भार्गव यांचे मार्गदर्शन असल्याचेही प्राचार्य डॉ. कान्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.