रवींद्र चव्हाण उद्या नागपूर-वर्धा दौऱ्यावर

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |

 

नागपूर
bjp  रतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बुधवार, २२ जुलै रोजी नागपूर आणि वर्धा दौऱ्यावर असून विविध सामाजिक, संघटनात्मक व जनहिताच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

raviindra chavan 
 
bjp दौऱ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता नागपुरातील रामनगर येथील श्री राम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘महायज्ञ’ कार्यक्रमात सहभागाने होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता प्रतापनगर चौक येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या नक्षत्र सभागृहात भाजपा नागपूर शहरतर्फे आयोजित सामाजिक व जनहितार्थ कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता वर्धा येथील बच्छराज धर्मशाळेत आयोजित ‘आरोग्य अमृतमहोत्सव’ उद्घाटन सोहळ्यास चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
 
bjp दुपारी २ वाजता गोपुरी, वर्धा येथील देशमुख सेलिब्रेश हॉलमध्ये भाजपा जिल्हा पदाधिकारी व नगरसेवकांच्या संवाद बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. दौऱ्याची सांगता दुपारी ४ वाजता नागपुरातील इमामवाडा येथील कुंदनलाल गुप्ता वाचनालय प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा गौरव दिन’ कार्यक्रमात उपस्थितीने होणार आहे.