कत्तलीसाठी नेत असलेल्या 7 गोवंशाची सुटका

*6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी अटकेत

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर, 
rescue-of-cattle : दुर्गापूर पोलिस ठाणे हद्दीतील पद्मापूर मार्गावर कत्तलीच्या उद्देशाने सुरू असलेली बेकायदेशीर गोवंश वाहतूक उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 7 गोवंश जनावरे व एका टाटा वाहनासह 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
 
k
 
 
 
मंगळवार, 21 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दुर्गापूर हद्दीतून पद्मापूर मार्गे रहमतनगर येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा पद्मापूर येथे सापळा रचून नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान संशयास्पद स्थितीत येणार्‍या टाटा-207 वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये 5 गाई व 2 बैल अशा एकूण 7 गोवंशीय जनावरांना कोंबून, निर्दयीपणे छळ करीत कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गोवंशीय जनावरे 7, टाटा-207 वाहन असा एकूण 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जनावरांच्या सुरक्षित हालचाली व उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’मध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
 
या प्रकरणी आरोपी फिरोज युसुफ कुरेशी (रा. दुर्गापूर), शेख अश्फाक इमाम कुरेशी (रा. रहमतनगर) आणि सादिक याकुब कुरेशी (रा. रहमतनगर) यांच्याविरुद्ध दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि मूल उपविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.