वर्धा,
sexual-assault-on-a-minor-girl : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपी विजय सूर्यवंशी यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश-३ अन्सारी यांनी दोषी ठरवून ४ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिन्यांचा कारावास, तसेच विविध कलमान्वये २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तर न्यायालयात शासकीय बाजू सरकारी अभियोता प्रसाद सोईतकर यांनी मांडली. दोन्ही बाजूचा युतिवाद व पुरावे लक्षात घेता न्यायाधीश अन्सारी यांनी शिक्षा ठोठावली.