मेधा मांजरेकरांनंतर शुभा गोडबोलेंनाही कॅन्सर

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Shubha Godbole has cancer. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने या आजाराशी सुरू असलेल्या आपल्या लढ्याबद्दल सांगितले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केमोथेरपीदरम्यान गळालेले केस आणि त्यानंतर नव्याने आलेल्या कुरळ्या केसांबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.शुभा गोडबोले यांनी स्वतःचे काही फोटो शेअर करत आपल्या नव्या केसांबद्दल लिहिले आहे. केमोथेरपीनंतर पुन्हा उगवणाऱ्या कुरळ्या केसांना ‘केमो कर्ल्स’ म्हटले जाते, याची माहिती त्यांना गुगल केल्यानंतर मिळाली. उपचारादरम्यान पूर्णपणे केस गळून गेल्यानंतर पुन्हा वाढणारे केस अनेकदा पूर्वीपेक्षा वेगळे आणि कुरळे असू शकतात, असे त्यांनी सांगितले.
 
 
kokan
 
काही जणांचे केस कालांतराने पुन्हा पूर्वीसारखे होतात, तर काहींचे केस कायमचे कुरळे राहतात. त्यामुळे आपले हे ‘केमो कर्ल्स’ कायमचेच राहणार आहेत, असे वाटत असल्याचे शुभा गोडबोले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आधीचे केस अधिक आवडायचे की हे नवे कुरळे केस, हे मात्र अजून ठरवता आलेले नाही, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.शुभा गोडबोले यांच्या पोस्टमधून त्यांच्या नव्या लूकबद्दलचा हलकाफुलका अंदाज दिसत असला, तरी त्यामागे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी सुरू असलेली त्यांची लढाईही स्पष्टपणे जाणवते. केमोथेरपीसारख्या कठीण उपचारांना सामोरे जात असतानाही त्यांनी आत्मविश्वास कायम ठेवला आहे.