शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी ठिय्या आंदोलन

*आदिवासी बहुल भिंगार व चाळीस टपरी विद्यार्थी पालक संतत्प

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
vacant teacher posts जळगाव जामोद तालुयातील भिंगारा व चाळीस टपरी या आदिवासी बहुल गावातील शाळेच्या शिक्षक शाळेतील रिक्त असलेली सर्व शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, ही मागणी घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन दि. २० जुलै रोजी करण्यात आले. या आंदोलनात आदिवासी बहुल भिगारा चाळीस टपरी येथील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
 
 
vacant teacher posts
 
 
शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आलाय. शाळा सुरु होऊन बरेच दिवस झाले तरी, जळगाव जामोद तालुयातील भिंगारा व चाळीस टपरी या आदिवासी बहुल गावातील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची जूनीच मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे? हा जुनाच प्रश्न आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम करीत आहे. गावातील शाळेमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ही एकमेव संधी असतानाही, शिक्षकांच्या अभावामुळे त्यांना या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. या गंभीर विषयाबाबत यापूर्वीही वारंवार स्थानिक प्रशासनाला निवेदने दिली आहेत, परंतु अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.vacant teacher posts प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वैतागलेल्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी बुलढाणा येथील जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रिक्त शिक्षकांची पदे भरण्याबाबत निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या आंदोलनाची गंभीरतेने दखल घेतली असून सात शिक्षकांपैकी सहा शिक्षकांची या शाळांवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. अशी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे