ड्रोनच्या परफेट लोकेशनने वाघीण जेरबंद

*वनरक्षक सिद्दीकी यांना शाब्बासकी

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
विलास नवघरे
समुद्रपूर, 
tigress captured तालुक्यातील गिरड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या राणी वाघिणीच्या तीन वाघांना वर्षभर्‍यात वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद करून परिसरातील नागरिकांना दिलासा दिला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत ड्रोन तंत्रज्ञानाने निर्णायक भूमिका बजावली. वनविभागाच्या पथकाने वाघांच्या हालचाली, लपण्याची ठिकाणे आणि जंगलातील मार्गांचा अचूक मागोवा घेण्यासाठी ड्रोनचा प्रभावी वापर केला. ड्रोन मास्टर वनरक्षक एस. एस. सिद्दीकी यांनी वेळोवेळी घेतलेल्या लोकेशनमुळे वाघांचे अचूक स्थान वनअधिकार्‍यांना समजत गेले. त्यामुळे पथकाला योग्य वेळी योग्य दिशा मिळाली मोहीम फत्ते झाली.
 
 

tigress captured 
 
गिरड परिसरातील घनदाट जंगलात वाघांचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. आमदार समिर कुणावार यांच्या पुढाकाराने उपवनसंरक्षक हरविर सिंग, सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात ड्रोनच्या मदतीने हालचालींवर सतत लक्ष ठेवता आले. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पिंजरे लावण्यात आले आणि पथकाची मांडणी करण्यात आली. त्यामुळे वनकर्मचारी, नागरिक आणि वाघ हे सुरक्षित राहिले.
गिरड परिसरातील राणी वाघिणीने सुमारे दोन वर्षांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला. एका बछड्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला. तीन बछडे मोठे झाल्यानंतर जंगलाबाहेर हालचाली सुरू केल्या.tigress captured नागरिकांत भीतीचे वातावरण होते. ६ महिन्यांपूर्वी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात २ पिल्लांना जेरबंद करून स्थलांतरित केले. यातील एक वाघिनीच्या भ्रमतीमुळे भीतीचे वातावरण झाले. वनविभागाने कॅमेरा ट्रॅप, गस्त, पिंजरे आणि ड्रोनच्या साहाय्याने लक्ष ठेवत अखेर या वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद केले.
वर्धा वन्यजीव बचाव केंद्रातील वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, अभिषेक खेडुलकर, गोंदिया येथील एनएनटीआर पथकातील शूटर आशिष रामटेके, डॉ. मेघराज तुलावी, प्रणित सुर, भीमाशंकर तेली, ड्रोन मास्टर वनरक्षक एस. एस. सिद्दीकी तसेच गिरड येथील क्षेत्र सहाय्यक जी. पी. राऊत, वनरक्षक पी. डी. बेले, रमेश चौके, कामतवार, कोंडबा गुंडप्पा, अमोल पिसे, पटले आणि वनमजूर पीआरटी पथक यांच्या परिश्रमामुळे ही मोहीम यशस्वी ठरली.