बसवर दुचाकी धडकली; एक जखमी

*धाडी-साहुर मार्गावरील अपघात

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
साहूर, 
two-wheeler-crashes-into-bus : धाडी-साहूर मार्गावर वडाळा बायपास फाट्याजवळ भरधाव दुचाकी थेट बसवर धडकली. यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना मंगळवार २१ रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. जखमीला वरुड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
jhk
 
 
आर्वी आगाराची एम. एच ४० वाय. ५९६८ क्रमांकाची बस वरूड येथून वर्धेच्या दिशेने निघाली होती. साहूर बसस्थानकाहून ही बस पुढील प्रवासासाठी निघाल्यावर १ किमी अंतरावर वडाळा बायपास फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव एम. एच. २७-००१८ क्रमांकाची दुचाकी अनियंत्रित होत बसवर धडकली. ही दुचाकी भारवाडी येथील भीमराव झिंगाजी भुरे हे चालवित होते. भुरे हे राजुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीवर असून ते कर्तव्यावर जात होते. दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील वाहन चुकीच्या दिशेने चालवित होता. दोन वाहनांत धडक होण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत बस चालकाने दुचाकीची धडक बसला होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पण, दुचाकी बसच्या मागील भागावर धडकली. यात दुचाकी चालक जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पंढरी धुर्वे, मंगेश भगत, संदीप शिंदे हे घटनास्थळी पोहोचले होते. या अपघाताची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली आहे.