साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली पाहणी

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
prataprao jadhav साखरखेर्डा येथे बांधण्यात आलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली . लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन होऊन ते जनतेच्या सेवेत कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील जनतेला सहज उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय बांधण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथेही ३० खांटाचे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे .१९ जुलै रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे साखरखेर्डा दौर्‍यावर असताना त्यांनी साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली तेथील कामाची पाहणी केली.
 
 
prataprao jadhav
 
 
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार जिल्हा आरोग्य अधिकारी मंडले उपास्थित होते. साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी पद भरती ला शासनाने मान्यता दिली आहे .. लवकर हे पदे भरण्यात येणार असून ग्रामिण रुग्णालयात जनतेच्या सेवासाठी लोकार्पित करण्यात येणार आहे.prataprao jadhav अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य प्रमुख कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी नंतर सांगितले तर काही तांत्रिक कारणामुळे ग्रामीण रुग्णालयाचे काम रखडले होते त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आल्या आहे इमारत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून येत्या महिन्याभरात हे ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी दिली आहे.