वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला वसंतराव नाईक नदीजोड प्रकल्प नाव द्या

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
यवतमाळ,
wainganga-nalganga-river-linking-project : महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प विदर्भ, मराठवाडा व राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांतीची पायाभरणी केली. शेतकरी कल्याणासाठी दूरदृष्टीने कार्य केले. त्यामुळे त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. या पृष्ठभूमिवर, राज्यातील या ऐतिहासिक नदीजोड प्रकल्पाला कै. वसंतराव नाईक वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प असे नाव देण्यात यावे, अशी मागणी हरिविजय राठोड यांनी निवेदनातून केली आहे.
 
 

y21July-Harivijay