२० दिवसात अडाण मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात १.०२ टयांची घट

केवळ ४६.४४ टक्के उपयुक्त साठा शिल्लक

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
water storage यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीला काही प्रमाणात हजेरी लावली असली, तरी गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने संपूर्ण तालुयात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असतानाच अडाण मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यातही पुन्हा घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे सिंचनाबरोबरच भविष्यातील पिण्याच्या पाण्याबाबतही चिंता वाढू लागली आहे.
 
 
 
water storage
 
अडाण मध्यम प्रकल्प हा परिसरातील महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. या प्रकल्पावर कारंजा शहराचे पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी सिंचनाची मोठ्या प्रमाणावर भिस्त आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागलेले असते. मात्र, यंदा पावसाची अनियमितता आणि दीर्घ खंडामुळे धरणात अपेक्षित पाण्याची आवक झालेली नाही. २० जुलै रोजीच्या अधिकृत नोंदीनुसार अडाण मध्यम प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ३८२.५० मीटर आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ३७८.३६ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ३१.२३ दशलक्ष घनमीटर आहे. धरणात सध्या केवळ ४६.४४ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे सोमवारी दिवसभरात एकही मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही, तर यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस १४४ मिलिमीटर इतका आहे.यापूर्वी २९ आणि ३० जून रोजी धरणाची पाणीपातळी ३७८.४५ मीटर होती. त्यावेळी धरणातील उपयुक्त साठा ३१.९२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४७.४६ टक्के होता. त्या तुलनेत अवघ्या वीस दिवसांत धरणातील उपयुक्त साठा ०.६९ दशलक्ष घनमीटरने घटला, तर साठ्याची टक्केवारी १.०२ टयांनी कमी झाली आहे. एकूण पावसाचे प्रमाण ७२ मिलिमीटरवरून १४४ मिलिमीटरपर्यंत वाढले असले तरी त्याचा धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित परिणाम झालेला दिसून येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून तालुयातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसारख्या खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे विहिरी, कूपनलिका किंवा शेततळी आहेत, ते तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या मदतीने पिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भूजलपातळीही झपाट्याने कमी होत असल्याने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.अडाण प्रकल्पातील पाणीसाठा कमी होण्यामागे पावसाचा दीर्घ खंड, धरण क्षेत्रात पुरेशा पाण्याची आवक न होणे आणि उपलब्ध पाण्याचा सातत्याने होत असलेला वापर ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.water storage जुलै महिन्याचा उत्तरार्ध सुरू असूनही दमदार पाऊस न झाल्यास प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शयता व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाचे लक्ष आता आगामी काही दिवसांतील हवामानाकडे लागले आहे. येत्या आठवड्यात चांगला आणि सलग पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल. अन्यथा खरीप हंगामाबरोबरच पुढील काही महिन्यांसाठी पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहू शकते.तालुयातील नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली असून, प्रशासनानेही धरणातील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या अडाण मध्यम प्रकल्पातील घटता पाणीसाठा हा चिंतेचा विषय ठरत आहे.
पाणीसाठ्याची सध्यस्थिती
पुर्ण संचय पातळी - ३८२.५० मी.
आजची पातळी - ३७८.३६ मी.
उपयुक्त साठा - ३१.२३ मी.
टक्केवारी - ४६.४४ टक्के
एकुण पाऊस - १४४ मी.मी.