तभा वृत्तसेवा
दिग्रस,
aarti-phupate : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट निर्णयक्षमता आणि संयमी नेतृत्वासाठी ओळखले जातात. विरोधकही त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे आणि विकास कामांवरील निष्ठेचे कौतुक करतात, ते केवळ सत्तेसाठी काम करणारे नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राचे भवितव्य घडवणारे आणि दूरदृष्टी असलेले नेते असल्याचे प्रतिपादन पुसद भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवार, 22 जुलै वाढदिवस हा ‘सेवादिन’ म्हणून साजरा करताना दिग्रस भाजपाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. फुपाटे बोलत होत्या.
बुटले महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात सकाळी 10 ते 4 दरम्यान 51 बेरोजगारांनी सुरक्षा रक्षकासाठी मुलाखत दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रात विश्वसनीय कर्मचारी भरती आणि मनुष्यबळ सेवा देणारी कंपनी एनव्हीके आयटी सोल्युशन अँड सिक्युरिटीचे प्रदीप कांबळे यांनी मुलाखती घेतल्या असून पुढील काही दिवसांत ते फोन करून बोलावतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, तालुकाध्यक्ष अरुण राठोड, शहराध्यक्ष अभय इंगळे, जागृती मेहता, मनोज राठोड, म. आतिक म. इस्राईल, अनिल भरारे, माजी न्यायाधीश संतोष जयस्वाल उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय इंगळे, प्रास्ताविक महादेव सुपारे व आभरप्रदर्शन अरुण राठोड यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.