‘बिग बॉस 20’ची उत्सुकता शिगेला

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
मुंबई
bigg boss 20 टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘Bigg Boss 20’च्या घोषणेनंतर या नव्या पर्वाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि भावनिक नाट्याचा संगम असलेल्या या शोचा होस्ट यंदाही अभिनेता सलमान खानच असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 

bigg boss 20 
जिओ हॉटस्टारने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘Bigg Boss 20’चा ट्रेलर आणि नवा लोगो प्रदर्शित केला आहे. त्यामुळे या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या नव्या पर्वाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कलर्स वाहिनी आणि जिओ हॉटस्टारकडून सादर करण्यात येणाऱ्या या शोच्या नव्या सिझनसाठी डोळ्याच्या प्रतिकात्मक लोगोतही बदल करण्यात आला असून, यावेळी मल्टी कलर्स पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे.
“२ दशकांनंतर अजूनही मोस्ट आयकॉनिक वन.. #BiggBoss20 जल्द आ रहा है. #JioHotstar आणि @colorstv वर” अशा आशयाची कॅप्शन देत जिओ हॉटस्टारने या नव्या पर्वाची माहिती दिली आहे. मात्र, ‘Bigg Boss 20’च्या अधिकृत प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. निर्मात्यांनी केवळ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या सिझनचे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमान खानचा अलीकडील एका कार्यक्रमातील लूक चर्चेत असतानाच आता ‘बिग बॉस 20’च्या होस्टच्या भूमिकेतही तो दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी हे पर्व विशेष आकर्षणाचे ठरण्याची शक्यता आहे.यंदाच्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आणि ‘बिग बॉस’च्या घरात कोणते नवे वाद, मैत्री आणि भावनिक क्षण पाहायला मिळणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.