वर्धा,
devabhau-krishi-mauli-event : राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला शेतकरी बिल आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रामध्ये उद्या २३ रोजी करण्यात आले असल्याची माहिती भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली येरावार यांनी दिली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ८ हजार गरजू शेतकरी महिलांना विशेष कृषी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
महिलांचे श्रम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, शेती उपयोगी अवजारे (खुरपे, विळा) आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च दिली जाईल. उद्या वर्धा विधानसभा मतदार संघातील पवनार, देवळी विधानसभेतील चितोडा आणि हिंगणघाट मतदार संघातील वेळा येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे येरावार यांनी कळवले आहे.