वर्धा,
bjp मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित अमृत आरोग्य तपासणी शिबिर तसेच भाजपा कार्यकर्ते संवाद कार्यक्रमानिमित्त २२ जुलै रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वर्धेत आगमन झाले असता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर पावसात भाजपा महिला आघाडीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली येरावार, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या