बीएलओंच्या घरभेटीला गती देण्याची आवश्यकता नागरिकांची नाराजी

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
blo-home-visits : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र तालुयातील काही भागांत बीएलओच्या घरभेटी अपेक्षित गतीने होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काही नवतरूण मतदरांनी १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होत असल्यास त्यांनी सुद्धा बिएलओ नोंदणी करावी. मुस्लीम बहुल वस्ती मध्ये या कामाला वेग आला आहे. या भागातील बिएलओचे कौतुक केले जात आहे.
 
 

blo 
 
 
 
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट घेऊन माहितीची पडताळणी करणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे तसेच आवश्यक बदलांची नोंद घेणे ही बीएलओंची जबाबदारी आहे. काही नागरिकांनी अद्याप त्यांच्या घरी बीएलओंची भेट झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंमलबजावणीबाबत काही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरभेटीदरम्यान एखादे घर बंद आढळल्यास संबंधित बीएलओने गणना प्रपत्र उपलब्ध करून द्यावे आणि माहिती सकलनासाठी किमान तीन वेळा पुन्हा भेट द्यावी, असे निर्देश आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार घरभेटीची मोहीम ८ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामांना गती देऊन प्रत्येक घराची माहिती बिएलओने करून राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.