चंद्रपूर,
chandrapur dams जिल्ह्यात एकूण मोठे/मध्यम व लघु 98 धरणांत एकूण जलसाठा 98.368 दलघमी (30.90 टक्के) उपलब्ध झाला आहे. तर चंद्रपूरची जलवाहिनी असलेला इरई धरणात 62.499 दलघमी (41.01 टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी याच महिन्यात या 98 धरण प्रकल्पामध्ये 123.034 दलघमी (38.64 टक्के) जलसाठा उपलब्ध होता. यंदा धरणातील पाण्याची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत कमीच आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र दडी मारल्याने धरणाची पाणी पातळी खालावली होती. मात्र जिल्ह्यात सोमवार रात्रीपासून पावसाने सर्वत्र समानधारक हजेरी लावल्याने धरणाच्या जलसाठ्यात काहीसी वाढ झाली आहे.जिल्ह्यात आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, लालनाला प्रकल्प, अंमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव असे 10 मोठे व मध्यम धरण प्रकल्प, तर 88 लघु धरण प्रकल्प असे एकूण 98 धरण प्रकल्प आहे. तर महाजनकोचा इरई धरण प्रकल्प आहे.
यामध्ये आसोलामेंढा प्रकल्पात 24.39 दलघमी (46.61 टक्के), घोडाझरी 9.505 दलघमी (23.01 टक्के), नलेश्वर 2.6367 दलघमी (25.77 टक्के), चंदई 0.024 दलघमी (0.22 टक्के), चारगाव 7.701 दलघमी (44.41 टक्के), लभानसराड 1.159 दलघमी (15.77टक्के), लालनाला प्रकल्प 8.326 दलघमी (30.15 टक्के), अंमलनाला 8.376 दलघमी (37.66 टक्के), पकडीगुड्डम 7.083 दलघमी (60.04 टक्के), डोंगरगाव 6.019 दलघमी (48.38 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये संकल्पित उपयुक्त जलसाठा 213.349 दलघमी एवढा आहे. 22 जुलैपर्यंत या 10 प्रकल्पात 75.2197 दलघमी (35.26 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. तर 88 लघु प्रकल्प मिळून एकूण 98.368 दलघमी (30.90 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे.
इरईचा जलसाठा 41.01 टक्के
चंद्रपूर शहराची तहान भागवणार्या इरई धरण प्रकल्पात 22 जुलै रोजी 62.499 दलघमी (41.01 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी या तारखेला इरई धरण प्रकल्पात 72.422 दलघमी (47.52 टक्के) जलसाठा होता.
जिल्ह्यात163.3 मिमी पाऊस
जिल्ह्यात 1 जून पासून ते 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 163.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 361.5 मिमी पाऊस बल्लारपूर तालुक्यात, तर सर्वात कमी 70.5 मिमी पाऊस राजुरा तालुक्यात झाला आहे. तर, ब्रम्हपुरी तालुक्यात 219.7 मिमी,चंद्रपूर तालुक्यात 218.8 मिमी, नागभीड 192.8, भद्रावती 182.3 मिमी, गोंडपिपरी 168.7 मिमी, सिंदेवाही 163.6 मिमी, कोरपना 162.2 मिमी, सावली 153.6 मिमी, चिमूर 147.7 मिमी, वरोडा 142.8 मिमी, जिवती तालुक्यात 140.8 मिमी, पोंभुर्णा 126.4 मिमी, तर मूल तालुक्यात 122.2 मिमी पाऊस पडला आहे.