मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा भाजपकडून रक्तदान शिबिर

*अनेकांचा भाजप पक्ष प्रवेश

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
blood-donation-camp : भारतीय जनता पक्ष जिल्हा संपर्क कार्यालय शिवालय येथे बुलढाणा शहर मंडळाच्या वतीने दि. २२ जुलै रोजी लाखो शेतकर्‍यांच्या हितासाठी ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
 
 
 
blood-donation-camp
 
 
 
कार्यक्रमात भाजपा शासकीय योजना प्रचार प्रसार समितीचे जिल्हा संयोजक अंबादास घेवंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनलेल्या अनेक लाभार्थी उद्योजकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला. उबाठा मोताळा उपतालुकाध्यक्ष श्रीकृष्ण मापारी, तसेच धामणगाव देशमुख येथील माजी सरपंच बाळू देशमुख इंदिरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते समीर खान, सागर हिवाळे, शेख अनिस, शेहजाद शाह, शेख रईस, शाहरुख खान,सय्यद जाकीर यांसह बबन चिकटे, पंकज गायकवाड,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
 
 
रक्तदान शिबिर प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, अण्णासाहेब पवार, माजी जिप सदस्य पुरुषोत्तम लाखोटीया, प्रा.विष्णुपंत पाटील, सिंधु खेडेकर, नारायण हिलगे, मुन्ना बेंडवाल, डॉ. मधुसूदन सावळे, अंबादास घेवंदे, शंकर मलवार, सचिन टेंभिकर, कुलदीप पवार, राजेंद्र पवार, अमोल जाधव, अ‍ॅड. दशरथसिंग राजपूत, प्रा. प्रभाकर वारे, मुकुंद देशपांडे, करण बेंडवाल, नितीन बेंडवाल, पवन बगाडे, बाळू ठाकरे, संदीप वानेरे, प्रशांत देशपांडे, अकिल हाजी, राजू खान, किरण नाईक, संजय मोटे, राजू खरात, गजानन अवसरमोल, शेख शगीर, प्रदीप तोटे, नारायण देशमुख, सचिन शेळके, पंकज गायकवाड, स्वराज विजयराज शिंदे, प्रणव दत्ता पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल नरोटे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रक्तदाते उपस्थित होते.