‘एक पेड माँ के नाम’ हा कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम : पं. अग्निहोत्री

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वर्धा,
ek ped maa ke naam एक पेड़ माँ के नाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला एक भावनिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम आहे. या मोहिमेत आपण आपल्या आईच्या सन्मानार्थ एक रोपटे लावून तिचे रक्षण करण्याचा संकल्प करतो. हा उपक्रम निसर्ग आणि आई या दोघांप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.ते गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात बोलत होते.
 

ek ped maa ke naam campaign inspires students to protect environment in wardha 
यावेळी मुख्याध्यापक डॉ. प्रिया मिश्रा, प्रशासकीय अधिकारी अभिजित रघुवंशी यांची उपस्थिती होती.ते पुढेे म्हणाले की, आई ज्याप्रमाणे निःस्वार्थपणे आपल्या मुलांचे पालनपोषण करते त्याचप्रमाणे वृक्षही आपल्याला प्राणवायू, फळं, फुलं आणि सावली देतात. आपल्या सर्वांच्या जीवनात आईचा दर्जा सर्वोच्च असतो. आईच्या ऋणाची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. परंतु, तिच्या नावाने एक झाड ek ped maa ke naam लावून आपण तिच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करू शकतो असे ते म्हणाले.आपल्या आईच्या नावाने वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. प्रत्येक विद्याथ्र्याने एक रोप लावून त्याची नियमित काळजी घेण्याचा संकल्प केला.