‘त्या’नराधमाला फाशीच द्या

खटला जलदगती न्यायालयात चालवा

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे),
rotha-torture-case : रोठा शिवारात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीच द्या, अशा मागणीचे निवेदन मंगळवार २१ रोजी स्थानिक पोलिसांना देण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
kl;
 
 
रोठा शिवारात घडलेल्या या घटनेतील दोषीला अटक करण्यात आली ही समाधानाची बाब आहे. त्या नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना देण्यात आले.
 
 
सदर निवेदन देण्यापूर्वी संतप्त युवकांनी गांधी चौकातून मोर्चा काढला होता. यावेळी आशिष देवतळे, मुन्ना शुक्ला, अॅड. पंकज झाडे, गंगाधर कलोडे, गुड्डू कुरेशी, कैलाश पालीवाल, तुषार हिंगणेकर, नगरसेवक दुर्गा बेलखोडे, सुनील बोंबले, पंकज मेंढे, बंटी बेलखोडे आदींचा सहभाग होता.