फेक नेरेटिव्ह खोडून काढण्यासाठी कार्यकत्र्यांनी बोलके व्हावे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
ravindra-chavan : आज देशभरामध्ये विरोधक समाजात फेक नेरेटिव्ह पसरवून सरकार व भाजपाबद्दल गैरसमज पसरवत आहे. त्यामुळे समाजात अराजकता माजविण्याचा विरोधकांचा मोठा प्रयत्न यातून दिसून येतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी अशाच फेक नेरेटिव्हचा आधार घेत निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते अयशस्वी झाले. त्यामुळे भाजपाच्या कार्यकत्र्यांनी बोलके होत समाजात विरोधकांचा खरा चेहरा उघडकीस आणावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
 

h 
 
 
ते वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर आज २२ रोजी आले असता स्थानिक देशमुख सेलिब्रेशन येथे आयोजित पदाधिकारी संवाद बैठकीत बोलत होते. व्यासपीठावर यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. सुमित वानखेडे, आ. समीर कुणावार, भाजपा विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी आमदार सुधाकर कोहळे, ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, अविनाश देव, आकाश पोहाणे, अशोक कलोडे, श्रीधर देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्ष वैशाली येरावार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, भुपेंद्र शहाणे, किशोर दिघे, अर्चना वानखेडे, जयंत कावळे, शहर अध्यक्ष निलेश किटे, गिरीष कांबळे उपस्थित होते.
 
 
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा जिल्हा विकासात कुठेही कमी राहणार नाही तसेच जनसेवा करतानाच पक्षाचे कामही तेवढ्याच ताकदीने करू, असे आश्वासन दिले. जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी संघटनात्मक अहवाल सादर करीत महाराष्ट्रात वर्धा जिल्हा संघटनात्मकदृष्ट्या सुद्धा प्रथम क्रमांकावर राहील, अशी ग्वाही दिली.
 
यावेळी युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला. पदाधिकारी संवाद बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष-संयोजक, मंडळ अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वर्धा शहरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष संजय गाते व प्रमुख नेत्यांनी माल्यार्पण केले.
 
पावसातही महिला मोर्चाच्या अध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, रवीला आखाडे, माधुरी इंगळे, सारिका लोखंडे, शहर अध्यक्ष नीता सूर्यवंशी, रूपाली बडे, चित्रा ठाकूर यांच्या नेतृत्वात असंख्य महिला उपस्थित होत्या.