आरोग्य अमृत महोत्सवाचा शुभारंभ

पालकमंत्री डॉ. भोयर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची उपस्थिती

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
arogya-amrut-mahotsav : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
 
wardha
 
 
 
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व आरोग्य विभागाच्या वतीने स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे आज २२ रोजी आयोजित आरोग्य अमृत महोत्सवाच्या जिल्हास्तरीय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे, आ. डॉ. मनीषा कायंदे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगराध्यक्ष नयना तुळसकर, नगराध्यक्ष स्नेहल कलोडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. कुणावार आ. डॉ. मनीषा कायंदे, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी प्रास्ताविक केले.
 
शिबिरस्थळी हृदयरोग, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांग-अव्यंग व्यक्तींचा विवाह झालेल्या जोडप्यांना प्रमाणपत्र, श्रवणयंत्र, ब्रेल कीट, अंध काठी, चष्मे, आयुष्मान वय वंदना कार्ड, आयुष्मान गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.