प्रशांत किशोरांच्या ‘जन सुराज’वर आयकर धाड!

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
पाटणा,
income-tax-department-raids : बिहारची राजधानी पाटणा येथे राजकीय विश्लेषक आणि नेते प्रशांत किशोर यांच्या 'जन सुराज' या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने (आयकर विभाग) अचानक छापा टाकला आहे. प्राप्तीकर विभागाच्या पथकाकडून पक्षाच्या कार्यालयाची सखोल तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
 
 
 
income-tax-department-raids
 
 
पाटण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये 'जन सुराज' पक्षाचे मुख्य कार्यालय स्थित आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून परिसराला वेढा घातला असून तपास कार्य चालू आहे.
 
यासोबतच, प्रशांत किशोर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवी नारायण सिंह यांच्या उपाहारगृहावर (हॉटेल) देखील प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे. या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू असल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
सध्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे मुख्य कारण समोर येण्याची शक्यता आहे.