नवी दिल्ली,
lalit-modi आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदीने १६ वर्षांनंतर भारतात परतण्याची घोषणा केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याशी संबंधित २००९ च्या आयपीएल दक्षिण आफ्रिका प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर, तो या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात परतण्याची योजना आखत आहे, असे मोदीने सांगितले.

lalit-modi १६ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर त्यांना न्याय मिळाला आहे. नेहमीच आयपीएलच्या सर्वोत्तम हितासाठी काम केले आहे, असे ललित मोदी म्हणाला. आता न्यायाधिकरणाच्या निर्णयाने त्याला निर्दोष ठरवले आहे. मी या निकालाने अत्यंत आनंदी आहे. मी १६ वर्षे लढलो आणि अखेरीस सत्य समोर आले आहे. आता हे प्रकरण संपले आहे आणि मला माझ्या आयुष्यात पुढे जायचे आहे. मी भारतात परतण्यास उत्सुक आहे, असे मोदी म्हणाला. मुलगी ऑक्टोबरमध्ये एका मुलाला जन्म देणार आहे. त्यानंतर तो भारतात परत येईल. तस्कर आणि परकीय चलन हाताळणारे (मालमत्ता जप्ती) कायदा (SAFEMA) अंतर्गत गठीत केलेल्या अपीलीय न्यायाधिकरणाने, १६ जुलै रोजी दिलेल्या आपल्या निकालात, अंमलबारी संचालनालयाचे (ED) बहुतांश निष्कर्ष आणि लादलेले दंड रद्द केले.
lalit-modi २००९ च्या आयपीएलच्या आयोजनाशी संबंधित फेमा कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी ललित मोदी जबाबदार होते हे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर कोणताही ठोस पुरावा नाही, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.