आई रुक्मिणीची पालखी पंढरपुरात दाखल

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
कुऱ्हा (जि. अमरावती), 
mother-rukminis-palanquin : रुक्मिणी मातेचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथून ४३२ वर्षांपासून पंढरपूरला अखंडपणे पालखी जात आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर त्यासाठी परीश्रम घेत असते. २२ जुलैला पंढरपुरात दाखल झालेल्या आईच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.
 
 
 
jk
 
 
आई रुक्मिणीची पालखी १९ जूनला पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. ३३ दिवस सतत पायदळ प्रवास करून ही दिंडी २२ जुलैला पंढरपूर येथील आई रुक्मिणी मठ येथे दुपारी १२ वाजात पोहोचली. दिंडीच्या स्वागतासाठी मंदिराची सजावट रांगोळ्या, फुलांनी करण्यात आली होती. येथे उपस्थित भक्तांनी दिंडीचे जोरात स्वागत केले. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त हिम्मतराव टाकोने व अशोक पवार तसेच अकोला येथील माउली नगरातील रवींद्र अंधारे आदीच्या उपस्थितीत दिंडी प्रमुख तथा संस्थानचे सचिव सदानंद साधू यांचे स्वागत व दिंडी चालक हभप पंकज महाराज महल्ले, दिंडी प्रमुख सुरेश चव्हाण, वीणेकरी विठोबा बागडे व सर्व वारकरी यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मारडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा वारकरी शांताबाई दोंडगे, कुसूम पवार, प्रल्हाद पवार, सूर्यकांत पवार, बाबुलाल मोरे आदींच्या सहभागाने स्वागत सोहळा पार पडला.