वर्धा,
nari-shakti-bhushan-award : मातोश्री स्व. राणीबाई अग्निहोत्री स्मृतिदिनानिमित्त २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शिवशंकर सभागृहात विद्यार्थी गुणगौरव तथा नारी शक्ती भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वान्मथी सी., प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांची उपस्थिती राहील तर अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री हे राहतील.
या कार्यक्रमात अग्निहोत्री ग्रुप ऑफ इ्स्टिटट्यूशन्स द्वारा संचालित सर्व महाविद्यालय व विद्यालयाचे गुणवत्ता प्राप्त विद्याथ्र्यांचा सत्कार तसेच सामाजिक, गीत, गायन, संगीत, नाट्य, नृत्य व कलाक्षेत्रात योगदान देणार्या डॉ. प्रवीणा जैन यांना नारी आरोग्य भूषण पुरस्कार, पल्लवी पुरोहित यांना आध्यात्मिक निवेदिका कला भूषण पुरस्कार, सुरभी ढोमणे यांना गीत संगीत जगत भूषण पुरस्कार, भारती कदम यांना संगीत गीत गायन नारी भूषण पुरस्कार, स्वरा अष्टपुत्रे यांना उत्तम शिक्षिका नारी भूषण पुरस्कार, सानिया बोपटे यांना गीत गायन संगीत कला भूषण पुरस्कार, शैलजा साळुंके यांना समाज भूषण नारी रत्न पुरस्कार, मुमताज अजमत खान यांना समाज भूषण नारी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी केले आहे.