मुंबई
pritam s k patil मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ‘अल्याड पल्याड’च्या दमदार यशानंतर आता ‘घबाडकुंड’ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विदर्भातील यवतमाळ येथून आलेल्या प्रीतम एस. के. पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ आणि ‘ढिशक्यांव’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी दिग्दर्शक म्हणून स्वतःची छाप पाडली. त्यानंतर ‘अल्याड पल्याड’ आणि ‘घबाडकुंड’ या सलग यशस्वी हॉररपटांमुळे त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट चित्रपटांची नोंद झाली आहे.
‘घबाडकुंड’च्या माध्यमातून प्रीतम एस. के. पाटील यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिल्याचा दावा करण्यात येत आहे. भय, रहस्य, अॅक्शन, भावना आणि थरार यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. त्यांच्या या विश्वासामुळेच ‘घबाडकुंड’सारखा भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार चित्रपट साकार होऊ शकला.
या यशाबद्दल बोलतानाpritam s k patil प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’वर जसे भरभरून प्रेम केले, तसाच प्रतिसाद ‘घबाडकुंड’लाही मिळत आहे. हा प्रतिसाद आमची जबाबदारी आणखी वाढवणारा आहे. मराठीत दर्जेदार हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही कायम राहील. प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच आम्हाला आणखी मोठ्या कथा सांगण्याचे आणि सिनेमॅटिक युनिव्हर्सचा विस्तार करण्याचे धाडस मिळते.”विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून उदयास आलेले प्रीतम एस. के. पाटील आज सलग सुपरहिट चित्रपटांच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान अधिक भक्कम करत आहेत. मराठी हॉररपटांना नवी दिशा देणाऱ्या या युवा दिग्दर्शकाकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.