कत्तलीसाठी जाणाऱ्या २१ जनावरांची सुटका

दोघांवर गुन्हे; एकास अटक

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वर्धा,
rescue-of-animals : गो-वंशाच्या कत्तलीवर राज्यात बंदी असली तरी तस्करांकडून कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना कत्तलखान्यांपर्यंत नेले जाते. दरम्यान, कत्तलीसाठी नेणार्या जनावरांना शेत शिवारातील एका झाडाला बांधून क्रूर वागणूक दिली जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून २१ जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी एकाला अटक केली. ही कारवाई हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाणमोड परिसरात आज २२ रोजी करण्यात आली.
 
 
 
jhk
 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात गस्तीवर असताना नासिर कुरेशी रा. हिंगणघाट याने गोवंश निर्दयतेने व चारा-पाण्याविना दाटीवाटीने कत्तलखान्याकडे पाठविण्यासाठी घाणमोड शिवारात वाघ सावली येथील बंडू गौरकार यांच्या शेताच्या शेजारील झाडाखाली बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून गोवंशांची सुटका केली. त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा किंवा पाण्याची सुविधा नव्हती. पोलिसांनी हनुमान गौरकर (५५) रा. वाघसावली याला ताब्यात घेत चौकशी केली असता जनावरं नासीर कुरेशी याच्या मालकीची असल्याचे पुढे आले. ही जनावरं कत्तलीसाठी पाठविले जाणार असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी हनुमान गौरकर याला अटक केली. नासीर कुरेशी याचा शोध पोलिस घेत आहे. या कारवाईत पोलिसांनी २.९५ लाख रुपये किंमतीचे २१ जनावरे जप्त केली.
 
 
ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश नागापुरे, खुशाल राठोड, मनोज धात्रक, महादेव सानप, आशिष महेशगौरी, दीपक जंगले, रितेश कुर्हाडकर, मंगेश आदे, विनोद कापसे, हर्षल सोनटक्के यांनी केली.