मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
sanitation-workers-honored : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव 2026 अंतर्गत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे नगर परिषद स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.
 
 

k 
 
 
समाज स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. जनसेवा व समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
 
यावेळी नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर, नगर परिषद बांधकाम सभापती तथा भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेविका अर्चना निंबोड, नगरसेविका साक्षी बोलूवार, नगरसेवक केशव मडावी, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष दिनेश नवघडे, विनोद देवजवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.