व्हिडिओ पाहण्यात आम्हाला रस नाही!

विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
SC stance on students' petition जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुद्दा बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. नीट परीक्षेतील सुधारणा आणि राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईत न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी एका वकिलाने सुनावणीदरम्यान केली. मात्र, या प्रकरणात स्वतंत्रपणे हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.भारताचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईशी संबंधित काही व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करण्याची परवानगी वकिलाने मागितली. मात्र, या विनंतीवर न्यायालयाने व्हिडिओ पाहण्यास स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले.
 

sata 
 
सुनावणीदरम्यान खंडपीठाने वकिलाला न्यायालयाचा वेळ अशा प्रकारे खर्च करू नये, असे सांगितले. ‘तुम्ही तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवत आहात,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यामुळे जंतर मंतरवरील लाठीचार्ज आणि पोलिसांच्या कारवाईवर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी न्यायालयाने स्वीकारली नाही. नीट परीक्षेतील सुधारणांशी संबंधित एक प्रकरण यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून न्यायालयाने यापूर्वीच उत्तर मागवले आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईसंदर्भात स्वतंत्र याचिका किंवा विनंतीवर हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.