शिवशाही बसला अचानक भीषण आग... अनर्थ टळला

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
धुळे
shivshahi bus धुळे शहरातील नगाव बारी परिसरात धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बसमध्ये एकूण ४९ प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

rht
नंदुरबार डेपोची नंदुरबार–धुळे मार्गावरील शिवशाही बस धुळे शहरात दाखल झाल्यानंतर नगाव बारी परिसरात पोहोचली असताना धावत्या बसमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने वाहकाच्या मदतीने तातडीने सर्व प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे खाली उतरवले.
 
 
प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेचे अग्निशमन दल तसेच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
 
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या घटनेची सखोल चौकशी एसटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.