बुलढाणा,
sulabh-toilet-at-the-st-depot : सर्वसामान्य नागरिक दररोज कामानिमित्त शहरात येणारे प्रवासी, विद्यार्थी सवलतीच्या दरात प्रवास करणारे बुलढाणा एसटी बसस्थानक आगारातील स्वच्छता गृहा समोर सुलभ शौचालय सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे असा फलक आगाराच्या वतीने लावण्यात आला आहे. परंतू प्रवाशांना स्वच्छालयासाठी प्रत्येकी दहा रूपये शुल्क आकारण्यात येते. राज्यातील सर्व बसस्थानकावरील शौचालय स्वच्छता गृह ठेका पद्धतीने स्मार्ट कंपनीला दिल्याने प्रवासी तिकीटांवर २ रूपये अधिभार लागू करण्यात आला आहे. तरीसुद्धा शुल्क आकरण्यात येत असल्याने प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बुलढाणा एसटी बस आगार प्रमुख गडलिंग यांच्याशी संपर्क साधला असता स्वच्छता गृहाचा ठेकाचा मेहतर कर्मचारी संघटना सफाई कामगांराना शुल्क आकरण्याच्या अटीवर देण्यात आला होता. आता हाच ठेका पद्धत राज्यातील सर्व एसटी बसस्थानकात स्मार्ट कंपनीला देण्यात आल्याने महामंडळाने प्रत्येक प्रवाश्याकडून दोन रूपये स्वच्छता अधिभार लावण्यात आला आहे. स्मार्ट कंपनीविरोधात देण्यात आलेल्या या ठेकापद्धतीविरूधात मेहतर कर्मचारी संघटना न्यायालयात गेली आहे. परंतू अद्याप या प्रकरणात न्यायलयाकडून स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे सफाई कामगाराच आगारातील शौचालय स्वच्छता गृहाचे काम पाहतात त्यांना प्रवाश्याकडून पैसे वसूल करू नये असे सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा या संदर्भात अनेक प्रवाशांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन तक्रारी केल्या आहेत. १८ जुलै पासून प्रत्येक प्रवाश्याकंडून तिकीटावर २ रूपये स्वच्छता अधिभार आकरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. २२ जुलै रोजी धाड येथील डॉ. सुनील जोशी कामानिमित्त बुलढाण्यात आले असतांना बुलढाणा बस स्थानकावरील स्वच्छता गृहात गेले असता त्यांना सुद्धा दहा रूपयाची मागणी शौचालय कामगाराने केल्यामुळे संबधित फलक कशासाठी लावला अशी विचारणा केली असता त्यांना उरमट भाषेत बोलण्यात आल्याने त्यांनी रितसर बसस्थानकावरील तक्रार व सुचना पुस्तकात तक्रार नोदवून थेट आगार प्रमुख गडलिंग यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली आहे.