नागपुरात स्वाईन फ्लूचा शिरकाव

जुलै महिन्यात आढळले २५ रुग्ण

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
नागपूर
swine flu cases पावसाळ्याच्या सुरुवातीसह शहरात हंगामी इन्फ्लूएंझा ए अर्थात एच१एन१ ने म्हणजे स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. जुलै २०२६ मध्ये आतापर्यंत २५ रुग्णांना एच१एन१ ची लागण झाल्याचे १५ प्रयोगशाळा तपासणीतून निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १३ रुग्ण थेट नागपूर मनपा हद्दीतील आहेत.
 

swine flu cases rise in nagpur, 25 h1n1 patients detected in july and one death reported 
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात एकूण २५ रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक झाली. बैठकीत डॉ. नयना दुपारे, डॉ. नेहा निखाडे, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. समितीने २ रुग्णांच्या प्रकरणांचा आढावा घेतला. त्यात १ मृत्यू हा एच१एन१ मुळेच झाल्याचे मान्य करण्यात आले, तर दुसऱ्या रुग्णाला इतर सहव्याधी असल्याने तो मृत्यू एच१एन१ मुळे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. एच१एन१ हा श्वसनाचा विषाणूजन्य आजार आहे. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण बरे होतात. पण खालील गटांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. सेलोकर यांनी नागरिकांना केले आहे.
कोणत्या रुग्णांना धोका जास्त
-६० वर्षांवरील व्यक्ती
-गर्भवती महिला
- बालके
-मधुमेह, रक्तदाब, हृदय, किडनी, दमा किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण
-ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे. स्वतःहून प्रतिजैविके घेऊ नयेत.
मनपाची युद्धपातळीवर तयारी
- शासकीय-खासगी रुग्णालयांतील आयएलआय आणि सारी रुग्णांचे रोज निरीक्षण
- प्रत्येक एच१एन१ रुग्णाचा दररोजचा अहवाल
- खाजगी डॉक्टरांना संशयित रुग्ण त्वरित कळविण्याचे आदेश
- शासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे उपचार आणि संसर्ग नियंत्रण
-टॅमीफ्लूसारखी आवश्यक औषधे उपलब्ध
- झोपडपट्ट्या आणि शाळांमध्ये जनजागृती मोहीम
- प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करून उपचारात बदल
घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका
कोट...
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण लक्षणांकडे दुर्लक्षही करू नये. विशेषतः सहव्याधी असलेल्यांनी वेळेवर उपचार घेतल्यास गुंतागुंत टाळता येते. वेळेवर निदान हाच सर्वात मोठा बचाव आहे.
फोटो... डॉ. दीपक सेलोकर या नावाने फोटो घ्यावा..
डॉ. दीपक सेलोकर,
वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका.