काश्मिरात अतिरेक्यांचा भ्याड हल्ला

पोलिसांवर बेछूट गोळीबार, एक जवान हुतात्मा

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
जम्मू
terrorist-attack-in-kashmir जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात बुधवारी संशयित दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका तुकडीवर गोळीबार केला. यामध्ये 35 वर्षीय पोलिस कर्मचाèयाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाèयांनी दिली. हा गोळीबार दुपारी साडेबाराच्या सुमारास अनंतनाग येथील लाल चौक परिसरात झाला. ज्या पोलीस तुकडीवर हल्ला झाला. ती अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती.

attack 
 
 
या हल्ल्यात कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
terrorist-attack-in-kashmir  लष्कर-ए-तोयबाची एक छुप्या स्वरूपातील संघटना असलेल्या ’द रेझिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी संबंधित परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
terrorist-attack-in-kashmir  अमरनाथ यात्रा सुरू असतानाच अनंतनाग शहरात सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे गेल्या चार दिवसांपासून ही यात्रा स्थगित ठेवण्यात आली आहे.