दहा जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी दाखविले तायक्वांदोचे कौशल्य

- विदर्भ कप ओपन तायक्वांदो स्पर्धा ः विजेत्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
taekwondo-tournament : डीजीएम तायक्वांदो स्पोर्ट्स एज्युकेशन अँड युथ अकॅडमी तथा दि असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल यूथ गेम्स अँड स्पोर्ट्स, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 18 व 19 जुलै रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ‘विदर्भ कप ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप-2026’ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विदर्भासह राज्यातील दहा जिल्ह्यांतील सुमारे 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
 
 
taekwondo-tournament
 
 
 
स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक सुनील दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत, तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास, भाजप शहराध्यक्ष रिशिकांत साहू, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. खगेंद्र येडे, रेफरी दुलीचंद मेश्राम, डॉ. अजय बिरणवार, सामाजिक कार्यकर्ते मनोज मेंढे, चंद्रपूर तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा सचिव सतीश खेमस्कर, वाशीमचे नितीन मेंढे, वर्धाचे शाम खेमसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस उपअधीक्षक दरेकर यांनी तायक्वांदो हा शासनमान्य क्रीडा प्रकार असून विविध शासकीय योजनांचा लाभ या खेळाला मिळत असल्याचे सांगितले. विशेषतः मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी तायक्वांदो अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनीही खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशीम, अमरावती, अकोला, नांदेड आदी दहा जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. विविध वयोगटांतील विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे प्रास्ताविक दुलीचंद मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भूमेश्वर राऊत यांनी तर आभार प्रदर्शन अमित मेश्राम यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक निलेश फुलबांधे, कमलेश बारेवार, ओमेश्वर तांडेकर, अर्जुन पटले, धर्मेंद्र दमाहे, आकाश पटले, टीकेश्वर सोनवणे, कुंजन डोये, स्वप्निल ठाकरे, कुसुम पटले, भारती चाचाने, निखिल डोंगरे, दुर्गाप्रसाद मेश्राम, प्राची मौदेकर, आचल राऊत, पूर्वा भांडारकर, प्रथम भांडारकर आणि शुभम सोलंकी यांनी विशेष सहकार्य केले.
...