वर्धा बंद; बजाज चौकातून निघणार मोर्चा

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वर्धा,
wardha-bandh : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला प्रतिसाद देत वर्धा जिल्ह्यातही वंचितच्या वतीने वर्धा बंद पाळण्यात येणार असून सकाळी १० वाजता बजाज चौकातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
 

 jl 
 
 
 
जिल्हाध्यक्ष किशोर खैरकार यांच्या नेतृत्वात निघणारा हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, तेथे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.