आरती वानखडे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष

प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली नियुक्ती

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
अमरावती,
aarti-wankhade :  अमरावती जिल्हा महिला मार्चाच्या प्रभारी आरती राजेश वानखडे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी गुरूवारी रात्री नियुक्ती केली.
 
 
j
 
चित्रा वाघ यांनी आपली संपूर्ण कार्यकारणीच आज जाहीर केली आहे. या कार्यकारणीत त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील कार्यक्षम महिला पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. आरती वानखडे या तिवस्याचे आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आहेत. त्या भाजपात सक्रिय कार्यकर्ता म्हूणन नेहमीच कार्यरत असतात. त्यांच्यावर अमरावती जिल्हा महिला मोर्चा प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना चित्रा वाघ यांनी आपल्या टिममध्ये घेतले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.